Thursday 2 February 2017

read more चे ब्रेक

जगण्याचं वर्तूळ
आक्रसत चाललंय..

कोऱ्या डायऱ्या
सदासज्ज laptop
शब्दकोश.. संदर्भ ग्रंथ.. पुस्तकांनी
गच्च भरलेली शेल्फस..
सगळं एका मोबाईल मधे
जाऊन बसलंय..

जगण्याचं वर्तूळ
आक्रसत चाललंय..
विश्व.. जग.. देश.. आक्रसत
'मी'च्या डी पी मधे सामावलंय..!

त्यातून वर काढून
आपल्या जगण्याचं पुस्तक
वाचताना read more चे
ब्रेक पार करताना दमछाक होतेय

पण राहिलेला मजकूर डिलीट
करण्याची सोय नाहीए..
लिहिणाराची सही दिसेपर्यंत
वाचत राहायचंय..

जगण्याचं वर्तूळ
कितीही आक्रसलं तरी
त्यातून सुटका नाही..!
***
आसावरी काकडे
१.२.२०१७

2 comments:

  1. एकदम खरं . .
    धुर धुळ आणि ट्रफिक ने कोंदलेल्या रस्ते घरी पोहोचवतात तेंव्हा अभिजात साहित्यान भरलेलं कपाटही आक्रसलेलच असंत . . .

    ReplyDelete
  2. apratim ..... vartmanatil jagane short and sweet nahi tar te aakrasun avaghadalay.... aani jagnyacha nusatach aabhas...!

    ReplyDelete