कोणता हा
पक्षी कुठे
साद घालतो
कोणाला?
गर्द मळभ
भोवती
त्यात
अदृश्य की झाला
किती
गळालीत पिसे
कोणी
झटापट केली
त्याच्या
असण्याच्या खुणा
कशा
विखुरल्या खाली
साद
कोणासाठी आहे
आणि
संघर्ष कोणाशी?
अस्तित्वाच्या
विवरात
कोण आहे
त्याच्यापाशी?
सारे मनाचेच
खेळ
साद,
संघर्ष आपण
आपल्याला
झाकणारे
गर्द मळभ
आपण
सार्या
गोतावळ्यामध्ये
कधी होतो
निराधार
अशावेळी
स्वतःसाठी
व्हावे
आपण माहेर..!
***
आसावरी
काकडे
९ मे २०१६
No comments:
Post a Comment