शब्दांचा
आरसा अद्भुत असा की
पार्याची
झिलई दोन्हीकडे..!
संकेत-वारसा
पाठी सांभाळून
संस्कारांची
खूण ठेवी पुढे
दाखवतो
बिंबे कधी विस्तारून
कधी
उसवून खोलातली..!
लिहिताना
होई स्वरूप-दर्शन
लाभे
आत्मभान लिहित्याला
आस्वादकालाही
अक्षरांमधून
स्वरूपाची
धून गवसते
बाह्य
रंग रूप दावतोच पण
आतलीही
वीण उलगडे..!
स्वरूप-दर्शन
घडे डोळसाला
तसेच
अंधाला उणे नाही
प्रत्येकाजवळ
शब्दांचा आरसा
‘पाहण्याचा’
वसा सोपा नाही..!
***
आसावरी
काकडे
२४
मे २०१६
No comments:
Post a Comment