गर्भगुहेतून पडता बाहेर
मिळाला आहेर उजेडाचा
तमाचे कवाड बंद झाले पुन्हा
आयुष्याचा पान्हा ओठी आला
विनटत गेली माऊलीची माया
जोजविली काया तळहाती
'मी'पण आकारा येत गेले तसे
अस्तित्वाचे फासे दृढ झाले
वेटाळत गेली माया उजेडाची
सावली तमाची दुरावली
वाटते फिरून शिरावे गर्भात
डोळे दीपतात फार तेव्हा..!
***
आसावरी काकडे
७.१.२०१७
मिळाला आहेर उजेडाचा
तमाचे कवाड बंद झाले पुन्हा
आयुष्याचा पान्हा ओठी आला
विनटत गेली माऊलीची माया
जोजविली काया तळहाती
'मी'पण आकारा येत गेले तसे
अस्तित्वाचे फासे दृढ झाले
वेटाळत गेली माया उजेडाची
सावली तमाची दुरावली
वाटते फिरून शिरावे गर्भात
डोळे दीपतात फार तेव्हा..!
***
आसावरी काकडे
७.१.२०१७
No comments:
Post a Comment