आयुष्यासोबत गुण-अवगुण
मोजलेले क्षण ओटी आले
मिळाल्या क्षणांचा विचार न केला
अवगुण-काला आवरला
कळो आले मना उणेपण काय
तरंगांची साय खरडली
आकांत करून अवगुण-झोळी
पुरी रिती केली हळू हळू
कसोटीच्या क्षणी पण उमगले
आत रुतलेले होते बाकी
त्वचाच झालेले जणू जन्मजात
टाकायची कात त्यांची कशी?
नवा आकांतही होत गेला क्षीण
त्याने मातीपण स्वीकारले..!
***
आसावरी काकडे
२१.१.२०१७
मोजलेले क्षण ओटी आले
मिळाल्या क्षणांचा विचार न केला
अवगुण-काला आवरला
कळो आले मना उणेपण काय
तरंगांची साय खरडली
आकांत करून अवगुण-झोळी
पुरी रिती केली हळू हळू
कसोटीच्या क्षणी पण उमगले
आत रुतलेले होते बाकी
त्वचाच झालेले जणू जन्मजात
टाकायची कात त्यांची कशी?
नवा आकांतही होत गेला क्षीण
त्याने मातीपण स्वीकारले..!
***
आसावरी काकडे
२१.१.२०१७
No comments:
Post a Comment