(ज्ञानेश्वरी उपमा ४)
तरंग होऊन स्वतःशीच खेळे
जळी जळ लोळे स्वानंदात
तसा तो खेळतो होऊन अनेक
पण तोच एक ठायीठायी
सर्व दृश्यजात केवल असणे
विविधांगी लेणे ईश्वराचे
प्रत्येक कण हे घर ईश्वराचे
चराचर त्याचे विलसित
त्याच्याविना एक क्षण जात नाही
कण रिता नाही त्याच्याविना..!
***
आसावरी काकडे
२७.१.२०१७
तरंग होऊन स्वतःशीच खेळे
जळी जळ लोळे स्वानंदात
तसा तो खेळतो होऊन अनेक
पण तोच एक ठायीठायी
सर्व दृश्यजात केवल असणे
विविधांगी लेणे ईश्वराचे
प्रत्येक कण हे घर ईश्वराचे
चराचर त्याचे विलसित
त्याच्याविना एक क्षण जात नाही
कण रिता नाही त्याच्याविना..!
***
आसावरी काकडे
२७.१.२०१७
No comments:
Post a Comment