(ज्ञानेश्वरी उपमा ८)
एकलेपणाला वाटले आतून
अनेक होऊन व्यक्त व्हावे
एकलेच बीज गच्च कोंदाटले
अनेकत्व ल्याले उगवून
प्रसवल्या भाषा एकाक्षरातून
आशयामागून निघाल्या त्या
कोट्यावधी जीव एका पेशीतून
एका थेंबातून सप्तसिंधू
स्वेच्छेनेच त्याने सारे निर्मियेले
वेगळे काढले स्वतःतून
प्रत्येका वेगळे नाम रूप दिले
स्वत्व देऊ केले ज्याचे त्याला
आणि आता म्हणे अनेकत्व खोटे
एकत्व गोमटे सत्य आहे
असूदेत एक तरंग नि पाणी
सोने आणि लेणी असो एक
वेगळेपणाने भेटू पुन्हा पुन्हा
सोबत निर्गुणा असूदेना..!
***
आसावरी काकडे
३.२.२०१७
एकलेपणाला वाटले आतून
अनेक होऊन व्यक्त व्हावे
एकलेच बीज गच्च कोंदाटले
अनेकत्व ल्याले उगवून
प्रसवल्या भाषा एकाक्षरातून
आशयामागून निघाल्या त्या
कोट्यावधी जीव एका पेशीतून
एका थेंबातून सप्तसिंधू
स्वेच्छेनेच त्याने सारे निर्मियेले
वेगळे काढले स्वतःतून
प्रत्येका वेगळे नाम रूप दिले
स्वत्व देऊ केले ज्याचे त्याला
आणि आता म्हणे अनेकत्व खोटे
एकत्व गोमटे सत्य आहे
असूदेत एक तरंग नि पाणी
सोने आणि लेणी असो एक
वेगळेपणाने भेटू पुन्हा पुन्हा
सोबत निर्गुणा असूदेना..!
***
आसावरी काकडे
३.२.२०१७
No comments:
Post a Comment