रोज येतो रोज रोज उगवतो
आणि मावळतो रोज रोज
येणे जाणे घडे क्षितिजावरती
ठरलेली गती पाळायची
ठरलेल्या भुका साद घालतात
पाय धावतात त्यांच्यामागे
त्याच किनाऱ्याशी पोचतात लाटा
आतला बोभाटा फेस होतो
नका पुसू आम्हा जन्म कशास्तव
भुकांचा विस्तव धाववितो
पाहिले न कधी पालखीत कोण
येई तो तो क्षण वाहतोय
झालो आम्ही फक्त पालखीचे भोई
आयुष्याची राई पाहिली ना..!
***
आसावरी काकडे
२८.२.२०१७
आणि मावळतो रोज रोज
येणे जाणे घडे क्षितिजावरती
ठरलेली गती पाळायची
ठरलेल्या भुका साद घालतात
पाय धावतात त्यांच्यामागे
त्याच किनाऱ्याशी पोचतात लाटा
आतला बोभाटा फेस होतो
नका पुसू आम्हा जन्म कशास्तव
भुकांचा विस्तव धाववितो
पाहिले न कधी पालखीत कोण
येई तो तो क्षण वाहतोय
झालो आम्ही फक्त पालखीचे भोई
आयुष्याची राई पाहिली ना..!
***
आसावरी काकडे
२८.२.२०१७
No comments:
Post a Comment