सारे एकाकार गाढ अंधारात
दिवसाची रात होते तेव्हा
उजाडता सारे आकार जागती
अस्तित्व जपती आपापले
उजेड पेरतो स्वत्व वस्तूंमध्ये
चराचरामध्ये नाम-रूपे
फोफावत जाते अस्तित्वांचे रान
येतसे उधाण उजेडाला
ओसरत जाते उसळती लाट
दिवसाची रात होई पुन्हा
तमाच्या कुशीत मिटून आकार
पुन्हा चराचर झोपी जाई
अनोखेच नाते विश्वाचे तमाशी
असे उजेडाशी वेगळेच..!
***
आसावरी काकडे
११.२.२०१७
दिवसाची रात होते तेव्हा
उजाडता सारे आकार जागती
अस्तित्व जपती आपापले
उजेड पेरतो स्वत्व वस्तूंमध्ये
चराचरामध्ये नाम-रूपे
फोफावत जाते अस्तित्वांचे रान
येतसे उधाण उजेडाला
ओसरत जाते उसळती लाट
दिवसाची रात होई पुन्हा
तमाच्या कुशीत मिटून आकार
पुन्हा चराचर झोपी जाई
अनोखेच नाते विश्वाचे तमाशी
असे उजेडाशी वेगळेच..!
***
आसावरी काकडे
११.२.२०१७
No comments:
Post a Comment