काय असते तहान
किनार्याला विचारावे
त्याचे कठोर प्राक्तन
कुणा कसे उमगावे?
पाणी अथांग समोर
कसे उतरावे त्यात
पाठ फिरवून दूर
कुठे नाही जाता येत
सार्या
इच्छांचा समुद्र
आत
कोंडून घ्यायचा
आणि पाहायचा फक्त
खेळ दोन्ही समुद्रांचा
काय असते तहान
किनार्यालाच कळावे
असे प्राक्तन कुणाच्या
कधी वाट्याला न यावे..!
***
आसावरी काकडे
६.४.२०१७
No comments:
Post a Comment