रणरणत उन्हाने
पेटवील्या मशाली
तडफड धरतीची
की शिगेला मिळाली
मग भणभण वारा
वादळी रूप ल्याला
निववुन भवताला
मेघ घेऊन आला
कडकड रव झाला
वीज भेदून गेली
सरसर झड येता
भू जरा शांत झाली
लवलव करणारे
कोंब आतून येता
हळुहळु धरतीही
विस्मरे तो फुफाटा
हिरवळ वर पाही
दूर सारून माती
किलबिल करणारी
पाखरे गीत गाती..!
***
आसावरी काकडे
२ जून २०१६साप्ताहिक सकाळ 23 जुलै 16
No comments:
Post a Comment