आकाश ‘ते’ नाही
नाही क्षितिजही
रस्ता, घाट.. काही
नाहीच ते
घर-दार नाती
गाड्या नि इमले
वृक्ष फळे फुले
हेही नाही
प्राणी पक्षी मासे
भाषा ग्रंथ ज्ञान
मानवी विज्ञान
तेही नाही
ग्रह तारे वायू
आकाशगंगाही
कृष्णविवरही
नाहीच ते
‘नेती नेती’ पण
आहे ते ते ‘ते’च
उपाधी त्याच्याच
असण्याच्या..!
***
आसावरी काकडे
१ सप्टे. २०१७
नाही क्षितिजही
रस्ता, घाट.. काही
नाहीच ते
घर-दार नाती
गाड्या नि इमले
वृक्ष फळे फुले
हेही नाही
प्राणी पक्षी मासे
भाषा ग्रंथ ज्ञान
मानवी विज्ञान
तेही नाही
ग्रह तारे वायू
आकाशगंगाही
कृष्णविवरही
नाहीच ते
‘नेती नेती’ पण
आहे ते ते ‘ते’च
उपाधी त्याच्याच
असण्याच्या..!
***
आसावरी काकडे
१ सप्टे. २०१७
व्वा, क्या बात है! 'अभोगी आयुष्य माझे'ची आठवण झाली...! बहोत खूब...
ReplyDelete