सांगितले त्यांनी
तोच असे कर्ता
आणि करविता घडे
त्याचा
शब्दांचे
प्रामाण्य मानून तयांनी
तोच ध्यानी मनी
चिंतियेला
अखंड आकांत मांडला
तरीही
साक्षात कुणीही
आले नाही
कळून चुकले कुणी
नाही देव
आहे सर्व ठाव रिता
रिता
मग नाही त्याला
देऊ केले नाव
साकारला देव भक्तीसाठी
देवाचे निर्माते
झाले सर्व संत
अनंत कवेत कवळले
देव-भक्त नाते
एकमेकावीण
राहील अपूर्ण असे
झाले..!
***
आसावरी काकडे
१५ जुलै २०१६
No comments:
Post a Comment