डोळ्यांच्या
खिडक्या अशा सजलेल्या
आशा पालवल्या उत्सवाच्या
कोणता उत्सव
प्रतीक्षा कोणाची
कोणत्या क्षणाची
देहजाणे
परंतू दारांना
कुलुपे किती ही
कुणीही कधीही येऊ
नये
खिडक्या उघड्या
दरवाजे बंद
आगळाच छंद अदृष्टाचा
असा महालात किंवा
झोपडीत
हीच त्याची रीत
सर्वांसाठी..!
***
आसावरी काकडे
१२ जुलै २०१६
No comments:
Post a Comment