संकल्प केलास ‘बहुस्याम’ असा
त्रिगुणांचा फासा टाकलास
सत्वाचा थेंबुटा रजाची उसळी
तमाची काजळी विस्तारली
खेळ सुरू झाला विश्वनाट्याचा या
उगवून लया जात राही
माजले सर्वत्र विकारांचे रान
स्वार्थाचेच भान बाळावले
अमर्याद हाव धावे सैरावैरा
सद्गुणास थारा राहिला ना
कोण थांबवेल सत्तेचे तांडव
न्यायाचे ‘गांडीव’ गळालेय
आणि तू खुशाल ‘यात मी नाहीच’
म्हणत हा नाच पाहतोस
बराच होतास शून्यात एकला
त्रिगुणांचा काला माघारी ने
***
आसावरी काकडे
४.३.२०१७
त्रिगुणांचा फासा टाकलास
सत्वाचा थेंबुटा रजाची उसळी
तमाची काजळी विस्तारली
खेळ सुरू झाला विश्वनाट्याचा या
उगवून लया जात राही
माजले सर्वत्र विकारांचे रान
स्वार्थाचेच भान बाळावले
अमर्याद हाव धावे सैरावैरा
सद्गुणास थारा राहिला ना
कोण थांबवेल सत्तेचे तांडव
न्यायाचे ‘गांडीव’ गळालेय
आणि तू खुशाल ‘यात मी नाहीच’
म्हणत हा नाच पाहतोस
बराच होतास शून्यात एकला
त्रिगुणांचा काला माघारी ने
***
आसावरी काकडे
४.३.२०१७
No comments:
Post a Comment