Friday, 27 November 2015

छायाचित्र म्हणजे..

छायाचित्र म्हणजे
अनंत काळाच्या प्रवाहातला
एक थेंब
चौकटीत पकडून ठेवणं !
थेंबातल्या
प्रतिबिंबात मावतं
तेवढंच उतरतं छायाचित्रात
पण केवळ
एक चौकट देऊन
पूर्णतेचा सुखावणारा अनुभव देतं ते
नजरेला आणि दृश्यालाही !
***


No comments:

Post a Comment