मावळत्या सूर्याने उगवत्या सूर्याला म्हटले,
उगवतो आहेस खरा
पण काळजी घे बाबा
दिवसाचं काही खरं नाही...
तूच जन्माला घालशील त्याला
पण त्याच्यात तुला तुझे रूप
दिसणार नाही..
तू ओतू पाहशील आपलं तेज
त्याच्या झोळीत
पण ते त्याला पेलवणार नाही
तू देऊ पाहशील आपली कोवळी ऊब त्याला
पण ती लपेटून घ्यायला
त्याला उसंत असणार नाही
तू दाखवू पाहशील वाट त्याला
पण व्यग्रतेनं ग्रासलेल्या त्याला ती दिसणार नाही...
दिवसाला सावरता सावरता
तूच थकशील आणि माझ्यासारखा
मावळू लागशील तूही...
किती काळ
निष्फळ ठरवणार आहे दिवस
आपलं अविरत उगवणं
त्याच्या उत्थानासाठी?
उगवता सूर्य म्हणाला,
निराश होऊ नकोस..
सगळे दिवस सारखे नसतात...
आणि उत्थानाचं म्हणशील तर
ती एकच एक स्थिर अवस्था नसते..
चढ.. उतार.. चढ..
अशी आवर्तनं चालूच राहतात..
जशी आपली निरंतर ये-जा..!
***
आसावरी काकडे
१.१.२०२२
नव्या पावालांनी । सजे पुन्हा भुई । भेटे नवी राई । नव्या जीवा ॥
Sunday, 2 January 2022
सूर्यांचा संवाद...
Subscribe to:
Posts (Atom)